उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे ऐकू नये, स्वतःचा एजेंडा राबवावा- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांना निमंत्रण नसल्यामुळे आज सकाळपासून राजकीय वाद रंगला होता. त्यातच आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेनेच्या (Shivsena) निर्णयाचे स्वागत करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची गरज नाही.

उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेमुळे सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेनेनं आपला स्वतःचा एजेंडा राबवावा, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची गरज नाही.

उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेमुळे सत्तेत आहे. उलट त्यांनाच सत्तेत राहण्यासाठी शिवसेनेची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की, त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ऐकू नये. त्यांनी आपला स्वतःचा एजेंडा राबवण्याला हरकत नाही. ते नुसते कुरकुर करतील यापलीकडे काहीच करणार नाही, ही आजची राजकीय परिस्थिती आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER