भारिप बहुजन महासंघ निवडणुकीनंतर वंचित आघाडीत विलीन होणार – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

अकोला :- आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र आल्यास आपल्या अडचणी वाढतील. त्यामुळेच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरोधकांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते आज अकोल्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार असून यापुढील सर्व निवडणुका या वंचित आघाडीच्या झेंड्याखाली लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. म्हणाले. सध्या कुठल्याही पक्षातील नाराज नेत्याला आमच्याकडून उमेदवारी देण्यात आलेली नाही. अनेक अनेक नाराज नेते आमच्या संपर्कात आहेत. मात्र विधानसभेसाठी अनेकांनी आमच्याशी संपर्क साधला असून, वेळ आल्यास त्याबाबतचा निर्णय घेऊ. आता आघाडीत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता काँग्रेसशी कुठलीही चर्चा होणार नाही. आता काँग्रेस आमच्या यादीत नाही. आम्ही राज्यातील सर्वच लोकसभा मतदार संघात उमेदवार देणार आहो. उद्या संपूर्ण उमेदवारांची यादी जाहीर करू. अकोला लोकसभेचा उमेदवारही उद्याच जाहीर करणार असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

ही बातमी पण वाचा :आंबेडकरांचे सोलापुरात येणे हे शिंदे यांच्यासाठी धोक्याचे ठरणार?

यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. सध्या केवळ नात्यागोत्याती माणसांना खुश करण्यासाठी आणि सत्तेच्या मोहापायी राजकारण सुरु झाले आहे. राजकीय कुटुंबातच फोडाफोड़ी सुरु आहे. स्मृती इराणी यांनी गांधी परिवारावर जमीन घोटाळ्यात केलेले आरोप हे दबाव आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. तुम्हाला घोटाळ्यांची माहिती होती तर कारवाई का केली नाही. त्यांच्या या दबावतंत्राला विरोधी पक्षातील नेते बळी पाडताना दिसत आहे. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांना ईडीच्या कारवाईची धमकी देण्यात आली असा मला संशय आहे. त्यामुळेच सुजय विखे भाजपात दाखल झाले. तसेच शरद पवार यांनी अचानक माढ्यातून घेतलेली माघार हे याचे संकेत आहे. असा दावाही त्यांनी यावेळी केला.

नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून देण्यात आलेली नाना पटोले यांची उमेदवारी डमी असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेसनं नाना पटोलेंना नितीन गडकरींच्या विरोधात दिलेल्या उमेदवारीवरून देखील पटोलेंची उमेदवारी डमी असल्याची टिका केली. शिवाय, समझोत्याचं राजकारण कराल तर जेलमध्ये जाल असा इशारा देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

ही बातमी पण वाचा : सोलापूर लोकसभा : – आंबेडकरांमुळे शिंदेंची वाट बिकट