नियम मोडण्यासाठीच पंढरपुरात आलो, वाटल्यास अटक करा – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar-Pandharpur

पंढरपूर : पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर (Vitthal-Rukmini Temple) भक्तांसाठीउघड करण्याची मागणीसाठी वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीकडून (VBA) पंढरपुरात आंदोलनाला सुरूवात झाली आहे. वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) मंदिर परिसरात दाखल झाले असून, आंबेडकरांची मागणी प्रशासनाने मान्य केलेली नाही. यावरून आंबेडकर अधिकच आक्रमक झाले असून, मी नियम तोडण्यासाठीच इथे आलो असल्याचे म्हटले आहे.

मंदिरे उघडी व्हावी या लोकांच्या भावना आहेत. लोकांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने विचार करावा.आम्ही आमच्या मागणीवर ठाम असून, नियम मोडण्यासाठी आलो आहे. लोक एकत्र जमल्यावर कोरोनाचा (Corona0 प्रादुर्भाव वाढत नाही हे दाखवण्यासाठी आंदोलन करत आहोत. आम्ही मंदिरात प्रवेश करण्यावर ठाम आहोत. मी स्वतः विठ्ठल मंदिरात प्रवेश करणार. जनतेने, वारकऱ्यांनी घेतलेला निर्णय राज्य सरकारने मान्य करावा, तुम्हाला वाटत असेल तर अटक करावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ही बातमी पण वाचा : प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्र्याचा फोन, मात्र पंढरपुरात आंदोलन होणारच

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER