काँग्रेस, राष्ट्रवादीकडून आघाडीत येण्याबद्दलची चर्चा केवळ देखावा – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

मुंबई : – भाजपाविरोधात महाआघाडी करण्यासाठी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस प्रयत्न करत आहेत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं लोकसभेचं जागावाटप पूर्ण झालं असून काँग्रेस, राष्ट्रवादीकडून आघाडीत येण्याबद्दलची चर्चा केवळ देखावा असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

आगामी निवडणुकीत भाजपाला टक्कर देण्यासाठी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस मैदानात उतरली आहे. असे असताना हे दोन्ही मित्र पक्ष महाआघाडी करणार असल्याचे बोलले झात आहे. परंतू, दोन्हा पक्षांचं जागावाटप जवळपास पुर्ण झाले आहे. महाआघाडीत येण्याबद्दलची बोलणी हे केवळ ढोंग आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे. धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. असे असले तरी जागावाटपावरून काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस चा हा केवळ देखावा असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भारिपा बहुजन महासंघानं एमआयएमसोबत आघाडी केली आहे. मात्र भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत यायचं असल्यास त्यांनी एमआयएमची साथ सोडावी, अशी काँग्रेस, राष्ट्रवादीची अट आहे. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनीदेखील प्रयत्न केले होते.