हे सरकार दारुड्यासारखे – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

मुंबई : हे सरकार दारुड्यासारखं आहे, दारुड्या व्यक्तीला दारू नाही मिळाली तर तो जसा घरातील वस्तू विकतो त्याप्रमाणे हे सरकार सोन्याची अंडी देणारी भारत पेट्रोलियम कंपनी विकायला निघाले आहे”, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे . राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी २४ जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

पुण्यामध्ये नाईट लाईफ संकल्पना राबवणार का ? आदित्य ठाकरे म्हणाले…

याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी काल (१८ जानेवारी) पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र बंदला विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा असल्याचे म्हटले. “महाराष्ट्र बंद करुन झोपलेल्या सरकारला जागे करु, हे बंद शांततेने करणार आहोत”, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे .

दरम्यान, महाराष्ट्र बंदला पोलीस परवानगी मागितली आहे का? असा प्रश्न विचारला असता, “मी कुणाकडेही परवानगी मागत नाही”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 24 जानेवारीच्या महाराष्ट्र बंदला 35 संघटनांचा पाठिंबा आहे, असे आंबेडकर म्हणाले. “राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याऐवजी लोकांनी हक्काच्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या झेंड्याखाली आंदोलन करावे”, असे आवाहन प्रकाश आंबेडक यांनी केले.