शासनाची अपेक्षा धरू नका, आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात करा; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

Prakash Ambedkar

मुंबई : आजवर या देशात अनेक विषाणू आले आणि गेले. आपण त्यांच्यावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोना विषाणूलाही आपण तोंड देऊ त्यासाठी आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात केली पाहिजे, असं मत बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘लॉकडाऊनमुळे लोकांमधील असेलला संवादच संपत चालला आहे. लोक एकमेकांना भेटायला सुद्धा घाबरत आहेत. यातून लोकांची सुटका झाली पाहिजे सरकार सध्या काही भूमिका घेईल असे वाटत नाही. त्यामुळे लोकांनी सरकारवर अवलंबून न राहता त्यांनी आपल्या आयुष्याची सुरवात केली पाहिजे.’

ही बातमी पण वाचा : लॉकडाऊन उठवण्यासाठी सरकारी पॅनलची विनंती

तसेच सामान्य माणसाला माझे आवाहन आहे की, आता त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली पाहिजे, शासनाची अपेक्षा करू नका, शासनाने आपल्या मनामध्ये जी भीती घातली आहे ती कमी होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आपोआपच आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात होईल. आपले मित्र मंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना भेटायला सुरुवात करा, असं आंबेडकर म्हणाले आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या संकटात देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधी पक्ष भाजप राज्य सरकारवर टीका करण्याची एक संधी सोडत नसल्याचं दिसत आहे. तर सत्ताधारी देखील आपल्या शैलीत विरोधकांना उत्तर देत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER