मोदीजी, फार उशिरा शहाणपण आलं !’ ‘त्या’ विधानावरून प्रकाश आंबेडकरांनी सुनावले

Prakash Ambedkar on pm modi

मुंबई : कोरोनाच्या स्थितीबाबत १० राज्यांतील ५४ जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदींनी गुरुवारी संवाद केला. प्रत्येक जिल्ह्यामधील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. एक लस वाया गेली तर कुणा तरी व्यक्तीला या रोगापासून आवश्यक असलेल्या संरक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे लस वाया जाणार नाही, याची काळजी घ्या, असे सांगितले.

यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर ट्विट करून टीका केली – मोदीजी, तुम्हाला खूप उशिरा हे शहाणपण सुचले. लस वाया जाणं म्हणजे एखाद्याचा जीव जाणं हे बरोबर आहे. जेव्हा सीरम आणि भारत बायोटेक लस बनवत होते तेव्हा तुम्ही त्याची नोंदणी का नाही केली? २१ जानेवारीपर्यंत का थांबलात? जेव्हा देशात लस तयार केली जात होती तेव्हा तुम्ही ती जगभरात वाटत होतात! तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? तेव्हा का म्हटले नाही की, पहिल्यांदा भारतीयांना लस देण्यात येईल आणि नंतर जगाला. कोरोनामुळे लोकांचा तडफडून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला तुम्ही आणि तुमचे सरकार जबाबदार नाही का?

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button