… तोपर्यंत गरीब मराठ्यांना ना सत्ता मिळणार ना आरक्षण : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं (Supreme court) मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. “जोपर्यंत श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता असेल, तोपर्यंत गरीब मराठ्यांना ना सत्ता मिळणार ना आरक्षण.” असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते .

यावेळी त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. ‘१८० ते १८२ आमदारांना हे आरक्षण नकोय. श्रीमंत मराठा विरुद्ध गरीब मराठा असं विधान आपण केलं होतं. मराठा आरक्षणाचं भवितव्य आपल्याला काय दिसतं?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “जोपर्यंत श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे, तोपर्यंत गरीब मराठ्यांना सत्ता मिळणार नाही आणि आरक्षणही मिळणार नाही. तेव्हा गरीब मराठ्यांनी आता काय भूमिका घ्यायची, त्यांनी त्यांची भूमिका ठरवावी. जातीबरोबर राहायचे की आपल्या आरक्षणाबरोबर राहायचे हा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. ” असे मत आंबेडकरांनी व्यक्त केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER