पुतळ्याची नव्हे तर, रुग्णालयाची गरज; पायाभरणी सोहळ्याला जाणार नाही – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम अचानक रद्द करण्याची वेळ राज्य सरकारवर आली. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपली भूमिक स्पष्ट केली. इंदू मिलमध्ये स्मारकाऐवजी लोकोपयोगी वास्तू उभारा. देशाला पुतळ्याची गरज नसून रुग्णालयाची गरज आहे. राज्यात या पैशाचा उपयोग कोरोना सेंटर उभारण्यात करावा. त्यामुळे इंदूमिल येथील पायाभरणी सोहळ्याचं पुन्हा आमंत्रण आलं तरी जाणार नाही, असं स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे (VBA) राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिल.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारला ऐनवेळी रद्द करावा लागला. या कार्यक्रमासाठी मोजून सोळा जणांना बोलवण्यात आले होते. त्यामुळे अनेक नेते नाराज होते. प्रकाश आंबेडकरांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. माझा पुतळा उभारण्याला विरोध आहे. पुतळा उभारण्याऐवजी एक बौध्दीक विचार केंद्र निर्माण व्हावं. तसंच इंदू मिलमधील स्मारकाच्या कार्यक्रमाला जाण्यात मला रस नाही. मात्र, आपल्याला आता आमंत्रण आले तरी या पायाभरणी कार्यक्रमाला आपण जाणार नाही. देशाला पुतळ्याची गरज नसून रुग्णालयाची गरज आहे. त्यामुळे राज्यात या पैशाचा उपयोग कोरोना सेंटर उभारण्यात करावा, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER