प्रकाश आंबेडकर यांनी शोधला मोदींना कोरोना लस टोचणाऱ्या परिचारिकेचा धर्म !

- हिंदू निष्ठेचे ढोल बडवतात, पण हिंदू नर्सेसवर त्यांचा विश्वास नाही

Prakash Ambedkar - PM Narendra Modi

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात कोरोना (Corona) प्रतिबंधक लस (Coronavirus Vaccine) टोचून घेतली. त्यांना लस टोचणारी परिचारिका ख्रिश्चन आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विट करून मोदींवर टीका केली – पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसेंदिवस हिंदू निष्ठेचा ढोल बडवत असतात. पण त्यांचा हिंदू नर्सेसवर विश्वास नाही. त्यांनी ख्रिश्चन नर्सकडून कोरोना लस टोचून घेतली. काय वर्तन आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या ट्वीटमुळे आता जोरदार राजकारण सुरू झाले आहे. सोशल मीडियातही आंबेडकरांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, लस टोचून घेतांना नरेंद्र मोदी यांनी केलेली वेशभुषा, त्यांचा वावर आणि काही गोष्टींवरुन सध्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यावेळी मोदी यांनी गळ्यात आसामी गमछा घातला होता. हा गमछा आसाममधील महिलांच्या आशीर्वादाचे प्रतीक मानला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER