“औरंगाबादचे नाही, तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करा”, प्रकाश आंबेडकरांची मागणी

Prakash Ambedkar

पुणे :- सध्या औरंगाबाद (Aurangabad) शहराचे संभाजीनगर (Sambhaji Nagar) नामांतराची मागणी जोर धरु लागली आहे. हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. औरंगाबादच्या नामांतरावरुन भाजपकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. पण, महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेसकडून (Congress) याला विरोध करण्यात येत आहे. या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीही (Prakash Ambedkar) उडी घेतली आहे. पुणे जिल्ह्याचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामागे आंबेडकरांनी ऐतिहासिक घटनांचाही हवाला दिला आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणूक जवळच आली असताना भाजपाने (BJP) औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दा पुढे केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणं हा अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असल्याचं म्हटलं. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी यावर आक्षेप घेतला आहे.

एबीपी माझा वृत्त वाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद ऐवजी पुण्याला संभाजी महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी उचलून धरली आहे. पाच वर्ष सरकारमध्ये असताना भाजपा-शिवसेनेनं औरंगाबाद शहराचं नाव का बदललं नाही? हे त्यांनी आधी स्पष्ट करायला हवं. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. मुघलांच्या काळात औरंगाबाद शहर राजधानी होतं. औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिक राहायला हवे.

दुसरा भाग म्हणजे संभाजी महाराज यांच्यावर पुणे जिल्ह्यात अंत्यसंस्कार झालेले आहेत. पुणे जिल्ह्यातील वडूज गावात त्यांची समाधी आहे. त्यामुळे संभाजी महाराजांच स्मरण राहावं, असं वाटत असेल तर योग्य भूमी पुणे शहर आणि जिल्हा आहे. त्यामुळे पुण्याला संभाजी महाराजांचं नाव दिलं तर अधिक उचित होईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ही बातमी पण वाचा : देशात धार्मिक राजकारण करण्याची गरजच काय? प्रकाश आंबेडकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER