…त्यामुळे मनसेला सोबत घेणार नाही – प्रकाश आंबेडकर

prakash-ambedkar-raj-thackeray

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेणार नसल्याचं स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. मराठी माणसासोबत जाण्याची मनसेची भूमिका पटत नसल्याने आम्ही त्यांना सोबत घेऊ शकत नाही असेही ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी आंबेडकर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाचे २५ उमेदवार देणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. यापूर्वीही त्यांनी आपली मनसेसोबतची भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही राष्ट्रवादी आहोत. तसंच आम्ही मनसेसोबत जाणार नाही. आमचा दृष्टीकोन प्रादेशिकही नाही आणि धार्मिकही नसल्याचे ते म्हणाले होते.

ही बातमी पण वाचा : मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत स्थान नाही : एकनाथ गायकवाड

काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएची युती तुटली होती. त्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी आमचा मान राखला नसल्याची खंत व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर हातमिळवणी केल्यानंतरही मुस्लीम मते वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये काडीमोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यावर बोलताना “एमआयएमसाठी आम्ही आमचे दरवाजे बंद केले नाहीत. त्यांनीच ते बंद केले. त्याची चावीही एमआयएमकडेच आहेत,”असे आंबेडकर यावेळी म्हणाले.