आंबेडकर जयंतीची जमा झालेली वर्गणी गरजूंसाठी वापरा; प्रकाश आंबेडकरांचे भावनिक आवाहन

Prakash Ambedkar

पुणे : कोरोना व्हायरचे वाढते रुग्ण लक्षात घेता यावर्षीची १४ एप्रिलची आंबेडकर जयंती ही आपआपल्या घरातच साजरा करा, असं आवाहन बाबासाहेबांचे वारसदार आणि वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. लॉकडाऊन १४ एप्रिलच्या आधी संपत असल्याने काही आंबेडकरी अनुयायांनी आंबेडकर जयंती सार्वजनिकरित्या साजरी करण्याचं योजिलं होतं. पण महाराष्ट्रातला व्हायरसचा वाढता प्रसार पाहता आंबेडकरी अनुयायांनी जयंतीच्या नावाखाली अजिबात घराबाहेर पडू नये, असंही आंबेडकर म्हणालेत.

त्याचप्रमाणे आंबेडकर जयंतीच्या नावाने गोळा केलेली वर्गणी कार्यकर्त्यांनी कोरोना बाधित गरजूंसाठी वापरावी, असंही आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. दरम्यान, भारतात कोरोनाची साथ अद्याप दुसऱ्या टप्प्यात पोहचली आहे. याचा अर्थ ही साथ कम्युनिटी स्प्रेडच्या स्वरूपात पसरलेली नाही. पण एम्स च्या संचालकांनी मुंबईसाठी धोक्याचा इशारा दिला आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाची साथ काही भागांमध्ये तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असल्याचं सांगितलं. आता ज्या भागात हा टप्पा गाठला आहे, तिथेच ती आटोक्यात ठेवली नाही, तर संपूर्ण शहरभर हा व्हायरस झपाट्याने पसरेल आणि मग आता न्यूयॉर्क किंवा सुरुवातीला वुहानची झाली, तशी अवस्था येईल. धक्कादायक म्हणजे गुलेरिया यांनी या थोडक्या भागांमध्ये मुंबईचं नाव घेतलं आहे.

घरावर रोषणाई करा, दिवे लावा, मात्र आंबेडकर जयंती घरीच साजरी करा : जोगेंद्र कवाडे