ठाकरे सरकारमधील आमदार, मंत्री कोरोनाच्या विळख्यात; प्राजक्त तनपुरेंना कोरोनाची बाधा

Prajakta Tanpure

अहमदनगर : आजपासून विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन (monsoon session) सुरू झाले आहे. दोनच दिवसाच्या या अधिवेशनातही मोजकेच आमदार मंत्री उपस्थित राहणार होते. त्यातही अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अनेकांना कोरोनाची लागण (Corona virus) झाल्याची माहिती आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी अधिवेशनासाठी मुंबईकडे रवाना झाले असता वाटेतच त्यांना कोरोनाचा अहवाल सकारात्मक असल्याचा फोन आला. तर, ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे.

अधिवेशनापुर्वी विधानसभा अध्यक्ष नाना पटोलो यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन अध्यक्षाविना होत आहे. एक एक करून ठाकरे सरकारमधील अनेक नेते कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत.

प्राजक्त तनपुरे यांनी ट्विटमध्ये लिहीले आहे की, “सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लवकरच तुमच्या सेवेत पुन्हा रुजू होणार”.

तर, शिवसेनेचे आमदार दळवी यांना कोरोना झाल्याचे कळताच, अधिवेशनासाठी निघालेले दळवी अर्ध््यावाटेतून माघारी परतले व कोणतीही लक्षणे नाहीत, मात्र खबरदारी म्हणून पुढील दहा दिवस आपण घरीच क्वारंटाईन राहणार असल्याचे त्यांनी सांगितले (Prajakt Tanpure Corona Positive).

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER