शरद पवारांचे कौतुक करून पंकजा मुंडे यांनी काही अयोग्य केलं नाही – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil - Pankaja Munde - Sharad Pawar

सांगली : या वयातही शरद पवार कार्यरत आहे. त्याचं कौतुकच असून पंकजा यांनी पवारांचं कौतुक करून काहीही अयोग्य केललं नाही, असं म्हणत भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) त्या विधानाचे समर्थन केले आहे.

नुकतीच ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे (NCP) नेते, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेदेखील (Dhananjay Munde) होते. या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. एरवी एकमेकांवर राजकीय चिखल पेकणारे बहिण भाऊ या बैठकीत आनंदाने एक6ित येऊन चेह-यावर दिलखुलास हास्य दिसले. तसेच, या बैठकीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शरद पवारांचे विशेष कौतुक केले. त्यांच्या कौतुकास्पद शब्दांमुळे माध्यमांत हा विषय चांगलाच फिरला. शरद पवार यांचं काम पाहून थक्क होऊन त्यांना ‘हॅट्स ऑफ पवार साहेब’ अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी पवारांची स्तुती केली होती. आता पंकजांच्या त्या विधानावर चंद्रकांत पाटील यांनी समर्थन दिले आहे.

सांगली (Sangli) येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांना पंकजा मुंडे यांच्या ट्विटरवरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हे समर्थन केलं. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याशी सहमत असल्याचं ट्विटही त्यांनी केलं आहे. ‘शरद पवार हे या वयात प्रत्येक आपत्तीमध्ये घराबाहेर पडतात हे वैशिष्ट्य असून राज्याचे मुख्यमंत्री घरात बसून असतात. त्यामुळे शरद पवारांचे कौतुकच आहे आणि कोणी चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे शरद पवारांचे कौतुक करून पंकजा मुंडे यांनी काही अयोग्य केलं नाही,’ असं सांगून चंद्रकांत पाटील यांना पंकजा मुंडे यांची पाठराखण केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER