सरकारची स्तुती करा, मग तुम्हाला बक्षीस मिळेल : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कोल्हापूर : कंगना रणौत  (Kangana Ranaut) हिच्यावर टीका केल्यानंतर अभिनेत्री जया बच्चन यांची स्तुती करणारे उद्गार ‘सामना’मधून प्रसिद्ध झाले. याबाबत प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, सामना असो वा शिवसेना किंवा सध्याचे राज्यातील सरकार यांना त्यांची फक्त स्तुती केलेली आवडते.

योग्य कारणासाठी केलेली टीकाही त्यांना खपत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल जेवढे गोडगोड बोलाल तेवढे त्यांना चांगले वाटते. त्यांच्याबद्दल चांगले बोला, त्याचे बक्षीसही तुम्हाला मिळेल, असा टोला पाटील यांनी यावेळी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER