साऊथची प्रज्ञा जयसवाल झाली सलमानची नायिका

Pragya Jaiswal - Salman Khan

सलमान खानने (Salman Khan) पन्नाशी पार केली असली तरी तरुण मुलींसोत नायकाची भूमिका करण्यास तो कचरत नाही किंवा नाहीसुद्धा म्हणत नाही. उलट तरुण नायिका असेल तर पडद्यावरील त्याच्या रोमांसला आणखी उठाव येतो आणि हे यापूर्वी अनेक सिनेमांमधून दिसून आले आहे. त्याच्यासोबत नायिका असलेल्या अभिनेत्री आता आई बनून संसारात रममाण आहेत, पण सलमान मात्र नव्या मुलींचा नायक म्हणून पडद्यावर दिसतच आहे. सध्या सलमान भावोजी आयुषसोबत ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमातील सलमानच्या नायिकेच्या नावाची घोषणा करण्यात आली नव्हती. कदाचित दिग्दर्शक महेश मांजरेकरची मुलगी सई मांजरेकर यात त्याची नायिका असेल असे म्हटले जात होते. पण सईऐवजी साऊथची तरुण लोकप्रिय नायिका प्रज्ञा जायसवालला (Pragya Jaiswal) सलमानची नायिका बनवण्यात आले आहे. प्रज्ञाने सिनेमाच्या शूटिंगमध्ये भागही घेतला असून तिच्यावर एक गाणे चित्रित झाल्याचे सांगितले जात आहे.

प्रज्ञाने 2014 में ‘विराट्टू आई डेगा’ या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर तिने काही अनेक तेलुगू सिनेमात काम केले असून यापैकी काही सिनेमे सुपरहिट झालेले आहेत. प्रख्यात दिग्दर्शक कृषच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या तेलुगू सिनेमा ‘कंचे’साठी प्रज्ञाला बेस्ट फीमेल डेब्यू- साउथ हा फिल्मफेअरचा पुरस्कारही देण्यात आला होता. सलमान खान या सिनेमात एका शीख पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारीत आहे. प्रज्ञा त्याची नायिका झाली असून सध्या ती महाबळेश्वरमध्ये या सिनेमाचे शूटिंग करीत आहे. सलमान आणि प्रज्ञावर एक रोमँटिक गाणे महाबळेश्वरमध्ये शूट केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER