आमच्या राज्याला कोणीही येऊन काहीही बोलल्यावर आम्ही सहन करावं का ? प्रफुल्ल पटेल यांचा संतप्त सवाल

prafull-patel

मुंबई : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे अशा मोठ्या शहरांमध्ये संपूर्ण देशातून लोक येऊन वास्तव्य करत असतात. लोकांना तिथे आपले घर निर्माण करून वास्तव्य करण्याची संधी देऊन चूक केली का ? आमच्या राज्याला कोणीही येऊन काहीही बोलल्यावर आम्ही सहन करावे का ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी राज्यसभेत केला. राज्यातील कोरोना स्थितीवर बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे कंगनाच्या (Kangana Ranaut) वक्तव्यावरून सुरू  असलेल्या वादावर भाष्य केले .

ही बातमी पण वाचा:- कंगना रणौत हिची काही तक्रार असेल तर तिनं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी – कॉंग्रेस

राज्यात “राज्यात आज अनेक समस्या आहेत. ऑक्सिजन सिलेंडर आणि रेमडेसिवीरची कमतरता आहे. सामूहिकपणे याचा सामना न केल्यास समस्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. राज्य सरकारांकडे आज निधीची कमतरता असून त्याची अनेक कारणं आहेत. केंद्राकडून मिळणारा जीसीटी अद्याप मिळालेला नाही.

कोरोनाविरोधील लढाईची सुरुवात केंद्राच्या आदेशाचे पालन करतच सर्व राज्यांनी केली. आता अनलॉक प्रक्रियादेखील केंद्रीय गृह मंत्रालयाकडून येणाऱ्या गाईड लाइन्सनुसारच होत आहे. जर आपण सर्वजण एकत्र लढत आहोत तर आरोप-प्रत्यारोप करण्याची गरज नाही.” असे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER