पवारांचे अत्यंत विश्वासू प्रफुल्ल पटेल यांना ईडीचा समन्स मिळणार

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे  (NCP) ज्येष्ठ नेते प्रफुल्ल  पटेल (Praful Patel) यांना पुन्हा एकदा ईडीकडून समन्स (ED summons) बजावण्यात येणार आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणात त्यांना समन्स बजावला जाणार असून, ईडी कार्यालयात जावे लागणार आहे. यापूर्वीसुद्धा  पटेल यांना समन्स पाठवण्यात आला होता; मात्र तेव्हा ते ईडी कार्यालयात गेले नव्हते. यामुळे त्यांना पुन्हा समन्स पाठवला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक आणि जमीन व्यवहार प्रकरणात त्यांचं नाव उघड झालं होतं.

त्यामुळेच ईडीनं त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. ड्रग्स माफिया इक्बाल मिर्चीचं आयएसआयशी कनेक्शन असल्याचं ईडीच्या तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणात ईडीनं  नुकतंच एक आरोपपत्र दाखल केलं होतं. मिर्चीची बायको हाजरा आणि मुले जुनेद आणि आसिफ यांच्यासह आणखी काही जणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. या आरोपपत्रातून ही बाब उजेडात आली असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER