प्रधानमंत्री पीक विमा योजना : केळीबाबत बदलले निकष शेतकरी हिताचे नाहीत – फडणवीस

Devendra Fadnavis - CM Uddhav Thackeray

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत निविदा काढताना महाराष्ट्र सरकारने केळी पिकासाठी निकषात केलेले बदल केळी उत्पादकांच्या हिताचे नाही, ते बदला; अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून केली आहे.

फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे की ही योजना केंद्र आणि राज्य यांची संयुक्त योजना आहे. यात दोघांचाही निधी असतो. या योजनेबाबत महाराष्ट्र सरकारने केळी पिकाबाबत विम्यासाठी निविदा काढताना जे बदल केले आहेत ते केळी उत्पादकांच्या हिताचे नाहीत. यामुळे विमा कंपन्यांच्या फायदा होईल पण केळी उत्पादकांचे नुकसान होईल. त्यामुळे या निकषात बदल करा. याबात माहितीसाठी फडणवीस यांनी खासदार रक्षा खडसे यांचे निवेदन पत्रासोबत जोडले असून त्या अनुषंगाने निविदांच्या निकषात बदल करण्याची मागणी केली आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये फडणवीस यांनी म्हटले आहे – प्रधानमंत्री पीक विमा योजनेत निविदा काढताना महाराष्ट्र सरकारने केळी पिकासाठी निकषात केलेल्या बदलांमुळे केळी उत्पादकांचे प्रचंड नुकसान होणार असल्याबद्दल आणि तातडीने फेरनिविदा करण्याबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER