प्रबोधनकार ठाकरे यांनी समतावादी व सत्यशोधक विचारांचा पुरस्कार केला : शरद पवार

sharad pawar-Prabodhankar Thackeray

मुंबई :  संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक असणारे पत्रकार, समाजसुधारक, वक्ते केशव ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांची आज जयंती. अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून प्रबोधनकारांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन केले आहे .

प्रबोधनकार ठाकरे यांनी समतावादी व सत्यशोधक विचारांचा कायम पुरस्कार केला. त्यांच्या साहित्यातूनही त्यांच्यातील समाजसुधारक प्रकर्षाने व्यक्त झाला. जाचक रुढी, अस्पृश्यता आणि हुकूमशाहीला आव्हान देण्यासाठी आपली वाणी व लेखणी राबवणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन, असे ट्विट पवारांनी केले आहे .

ही बातमी पण वाचा : “आमचे आजोबा..” म्हणत राज ठाकरेंनी दिला प्रबोधनकारांच्या आठवणींना उजाळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER