खबरदारी म्हणून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रभुकुंज सोसायटी सील

Prabhukunj Society Seal-Lata Mangeshkar

मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar) यांच्या प्रभूकुंज या इमारतीला बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सील केलं असल्याची माहिती समोर येत आहे. प्रभुकुंज सोसायटीत (Prabhukunj Society Seal)गेल्या आठवड्यात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोविड -19 (Covid-19)साथीच्या धोका टाळण्यासाठी सावधगिरी म्हणून शनिवारी लता मंगेशकर यांची इमारत सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रभुकुंज सोसायटीत लता मंगेशकर यांच्यासह त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर (Usha Mangeshkar)वास्तव्यास आहेत. याशिवाय सोसायटीत काही वयस्कर रहिवासीदेखील वास्तव्यास आहेत. मात्र गेल्या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने सोसायटीतील सर्व रहिवाश्यांच्या एकमताने सोसायटी सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांनी याबाबत परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे. आम्हाला आज संध्याकाळपासून प्रभुकुंज सोसायटी सील करण्याबाबत फोन येत आहेत. प्रभुकुंज सोसायटीतील रहिवासी आणि महापालिका प्रशासनाने मिळून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सोसायटी सील करण्याचा निर्णय घेतला आहे. वयस्कर रहिवाशांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड सतर्क राहणं जरुरीचं आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : कोविड -१९ केंद्रांचा खर्च बृहनमुंबई मनपा देणार नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER