प्रभू देवाने केले फिजिओथेरपिस्टसोबत लग्न

Prabhu Deva

डांसर, कोरियोग्राफर, अभिनेता आणि दिग्दर्शक प्रभुदेवाने दुसरे लग्न केले आहे. काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती की प्रभुदेवा त्याच्या भाचीसोबत लग्न करणार आहे. परंतु, या बातमीनंतर प्रभुदेवाच्या भावाने, प्रभूदेवाने लग्न केले असल्याची माहिती माध्यमांना दिली. मात्र प्रभूदेवाने भाचीशी नव्हे तर मुंबईतील एका फिजिओथेरपिस्ट सोबत लग्न केल्याचे त्याने सांगितले.

प्रभुदेवाच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, प्रभूदेवाने लॉक डाऊनच्या काळात मे महिन्यात महिन्यात फिजियोथेरेपिस्ट डॉक्टर हिमानीसोबत चेन्नईत लग्न केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रभुदेवा पाठदुखीने त्रस्त होता. पाठीवर उपचार करून घेण्यासाठी तो फिजीओथेरपीस्ट डॉक्टर हिमानी कडे जात असे. उपचार सुरू असतानाच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लगेचच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चेन्नईत या दोघांनी लग्न केले असून हे दोघेही चेन्नईतच राहत असल्याची माहितीही प्रभुदेवाच्या भावाने दिली.

प्रभुदेवा ने 1995 मध्ये रामलतासोबत लग्न केले होते. क्लासिकल डान्सर असलेली रामलता मुस्लिम होती. पण तिने प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला होता. या दोघांना तीन मुलं ही झाली होती. मात्र लग्न झालेले असतानाही प्रभुदेवा अभिनेत्री नयनतारा च्या प्रेमात पडला होता. तो नयनताराशी लग्नही करणार होता. रामलता जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तिने प्रभुदेवाशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये रामलता आणि प्रभुदेवा यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर प्रभुदेवा नयनतारा सोबत राहू लागला होता. परंतु त्या दोघांचेही न पटल्याने दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रभुदेवा एकटाच होता.

प्रभुदेवा सध्या सलमान खान, दिशा पटानी आणि रणदीप हुड्डा अभिनित ‘राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई’ चे दिग्दर्शन करीत असून तो साउथच्या ‘पोन मनिकवेल’ चित्रपटात पोलीस इन्स्पेक्टर ची भूमिका करीत आहे पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत तो प्रथमच दिसणार असून हा त्याचा अभिनेता म्हणून पन्नासावा चित्रपट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER