प्रभू देवा करणार भाचीबरोबर लग्न!

Prabhu Deva

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि प्रख्यात नृत्य दिग्दर्शक म्हणून प्रभू देवा (Prabhu Deva) ओळखला जातो. सध्या प्रभू देवा बॉलिवूडमध्ये चांगलाच व्यस्त आहे. अनेक चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शनाचे काम तर तो करीत आहेच, एक-दोन चित्रपटांचे दिग्दर्शनही तो करणार आहे. सध्या सलमान खान अभिनीत ‘राधे’ चित्रपटाचे दिग्दर्शन तो करीत आहेच. करिअरमध्ये तो आता यशाच्या शिखरावर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 47 वर्षीय प्रभू देवा आता पुन्हा दुसरे लग्न करणार असून यावेळी तो भाचीबरोबर लग्न करणार असल्याची चर्चा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जोरदारपणे सुरु आहे.

प्रभू देवा आता दुसरे लग्न करीत असता तरी दक्षिणेतील अनेक नायिकांशी त्याचे नाव जोडले गेले होते. यामुळेच त्याची पहिली पत्नी रामलताने त्याला 2011 मध्ये घटस्फोट दिला होता. या दोघांना तीन मुले होती. त्यापैकी एका मुलाते कॅन्सरमुळे 2008 मध्ये निधन झाले होते. त्यानंतर प्रभू देवाचे नाव अभिनेत्री नयनतारासोबत जोडले गेले होते. हे दोघे लवकरच लग्न करणार असेही म्हटले जात होते. परंतु काही कारणास्तव या दोघांनी लग्न केले नाही. मात्र त्यानंतरही प्रभू देवाचे काही नायिकांशी नाव सतत जोडले जात होते. आता बातमी आहे की तो भाचीबरोबर लग्न करणार आहे. पुढील वर्षी या दोघांचे लग्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER