प्रभासने खरेदी केली ६.५ कोटींची लॅम्बर्गिनी कार

Prabhas - Lamborghini Car - Maharashtra Today

‘बाहुबली’ सिनेमामुळे प्रभास (Prabhas) हा संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. केवळ साऊथमध्येच सुपरस्टार असलेला प्रभास बाहुबलीच्या सीरीजमुळे संपूर्ण देशाच्या ओळखीचा झाला. ‘बाहुबली’च्या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम केल्याने प्रभासची किंमतही वाढली. सध्या प्रभास तीन मोठ्या सिनेमात काम करीत आहे. प्रभासला अत्यंत राजेशाही पद्धतीने राहायला आवडते. त्यामुळेच त्याला आलिशान, स्टायलिश, लक्झरियस, आधुनिक गाड्यांचीही आवड आहे. प्रभासकडे अगोदरच काही महागड्या गाड्या असताना आता त्याच्या गाड्यांच्या ताफ्यात आणखी एका महाग गाडीचा समावेश झाला आहे. ही गाडी तब्बल ६.५ कोटी रुपयांची आहे. खरे तर प्रभासकडे ८ कोटी रुपये किंमतीची रोल्स रॉयसही आहे.

लॅम्बर्गिनी (Lamborghini) ही आलिशान लक्झरियस आणि एसयूव्ही कार बनवणारी जगातील श्रीमंतामध्ये लोकप्रिय असलेली कंपनी आहे. ही इटालियन कंपनी असून प्रत्येक वर्षी मोजक्याच परंतु अत्यंत वेगळ्या कारची निर्मिती करते. या कंपनीचे लेम्बॉर्गिनी एवेंटाडोर एस रोडस्टर मॉडेल खूप लोकप्रिय आहे. या कारची दिल्लीत ऑन रोड किंमत ६.५ कोटी रुपयांपर्यंत जाते. प्रभासने ही कार खरेदी केली आहे. कार खरेदी केल्यानंतर प्रभास हैदराबादमधील रस्त्यांवर ही गाडी चालवताना दिसला होता. प्रभासने गाडी घरी आल्यानंतर त्यावरीरल कव्हर काढताना आणि ही कार रस्त्यावर चालवतानाचे व्हीडियो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचे हे व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून अनेकांनी त्याचे अभिनंदनही केले आहे. प्रभासने त्याच्या वडिलांच्या सूर्या नारायण राजू यांच्या बर्थ अॅनिव्हरर्सरीनिमित्त ही महागडी ऑरेंज रंगाची लेम्बॉर्गिनी खरेदी केली आहे. प्रभासकडे सध्या सव्वा कोटींची जग्वार एक्सजे, ८ कोटींची रोल्स रॉयस फँटम, ५० लाखांची बीएमडब्ल्यू एक्स ३, ३० लाखांची सेडान कार स्कोडा आणि ४ कोटींची रेंज रोव्हर या महागड्या गाड्याही आहेत. प्रभास सध्या आदिपुरुष, सालार, राधे श्याम आणि नाग अश्विनच्या आगामी सिनेमात दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button