
नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (Prabhakar Khadilkar) यांचे नातू यांचे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा वाद रिकामटेकडा आहे. साहित्याचा मनावर परिणाम होतोच होतो. साहित्याबद्दल बोलतांना ते लिहितात,” जीवनाला स्पर्श करणारे वाक्य म्हणजे साहित्य .मानवी मनाच्या सुखदुःखांच्या आरसा म्हणजे साहित्य .या आरशात जगातील कोणालाही ,केव्हाही ,कुठेही जीवनाचे प्रतिबिंब दिसते ते साहित्य. मातेची माया आणि पित्याचे कठोर कर्तव्य यांनी विणलेल्या वस्त्र म्हणजे साहित्य !”
फ्रेंड्स आणि म्हणूनच या पुस्तकातील काही प्रसंग तुमच्याशी शेअर करावेसे वाटले. उद्देश हा आहे की पुस्तकातून माणूस कसा घडू शकतो. आणि मुख्य म्हणजे आपल्या सहवासातील आपले आदर्श म्हणजेच दीपस्तंभ ! टॉवर्स ! (Towers) यांचा आपल्या घडणीत कसा वाटा असतो.
त्यांच्या पुस्तकाचे नावच आहे “टॉवर्स !” मला ते खूप आवडलं. त्यांच्या आयुष्यात जी उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत,ज्यांनी त्यांच्या आयुष्याच्या घडणीमध्ये खूप मोठा हातभार आहे, तो त्यांनी या पुस्तकात लिहिला आहे. मुख्य म्हणजे हे पुस्तक त्यांनी त्यांचा नातू रोहित आणि त्याच्या वयाची इतर मुले की ज्यांच्या हातामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अल्लाउद्दीनचा दिवा आहे, अशा सगळ्यांसाठी अर्पण केलेला आहे. ते म्हणतात आमची पिढी धेय्यधुंदीत जगली .मात्र मध्यमवयीन पिढीचा त्रिशंकू झाला आहे. आणि म्हणूनच या एकविसाव्या शतकातल्या पिढीसाठी त्यांनी हा टॉवर उभा केला.
त्यांचे आजोबा नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे “मानवी टॉवर “त्यांचे सर्वस्व होते . आपोआपच त्यांच्या संपर्कातून अनेक” टॉवर्स “लेखकाला अनुभवायला मिळाले .यातून त्यांची मानसिकतेची प्रगल्भतेची उंची अतिशय वाढली .त्या टॉवर्सने त्यांना घडवलं. त्यांच्या आयुष्यातले सुखदुःखाचे अनेक प्रसंग त्यांनी अनुभवले आणि त्यांचे आयुष्य समृद्ध होत गेलं. त्यांचे आजोबाही लोकमान्य टिळकांचे अनुयायी. पुढे त्यांनी सांगितल्याप्रमाणे लोकमान्यनंतर ते महात्मा गांधी यांचे अनुयायी झाले .त्याशिवाय वल्लभ भाई पटेल ,स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे “टॉवर्स” त्यांच्या घरी येऊन गेलेले. स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लेखकाला पुष्पहार घातला आणि म्हणाले होते ,”हा हार तुझा नव्हे ह! तुझ्या घराण्याला आहे. क्रांतिकारकांचे घराणे तुझे ! “यास व्यक्तिमत्त्वांचा परिणाम म्हणून आव्हान झेलत ,संघर्षाचे जीवन मी जगलो .कधीही खचलो नाही .हा या दीपस्तंभा नचाच परिणाम असे लेखक म्हणतात.
फ्रेंडस् ! एकविसाव्या शतकातील आजच्या पिढीकडे देण्यासारखीं सगळ्यात महत्त्वाची संपत्ती हीच असणार आहे. ते म्हणजे हे टॉवर्स ! हे दीपस्तंभ ! सतत चुकणारयांना मार्ग दाखवणारे. मग सगळ्यांनाच ते प्रत्यक्ष जवळून अनुभवायला मिळतील असं नाही , पण बर्याच आठवणी ,बरेचसे . त्यांच्या जीवनातले बरेवाईट किस्से ,त्यांची वागणूक ही त्या त्या दीपस्तंभाचे दीप कायम प्रकाशमान ठेवतेच .कधी साहित्यातून ,कधी नाटकांमधून. म्हणूनच लेखक या पुस्तकाचा उद्देश लिहितांना म्हणतात, that’s the point of presenting this book,the’ point’ is to change the present !
सगळ्यांनाच आप्तांच्या मृत्यूला सामोरे जाण हे महा कठीण जातं. आत्ताच्या सारख्या साथीच्या रोगाच्या काळात तर अनेकांनी आपले आप्तजन गमावण्याची वेळ आली होती. अनेकजण या दुःखाला सामोरी ही गेलेले असतील. म्हणूनच लेखकाचे या बाबतीतले अनुभव मांडावेसे वाटतात. लेखकाच्या लहान भावाचे, तात्या चे टायफाईड च्या आजाराने निधन झाले, त्यापूर्वीच म्हणजे ते सात वर्षाचे असताना त्यांची आई कमलही देवाघरी गेली. या गोष्टींचा त्यांच्यावर तसेच त्यांचे वडील अप्पा यांच्यावरही फार परिणाम झाला . त्याच वेळी नाट्याचार्य म्हणजे आजोबा यांनी मुलाला सांगितले, “शोक आवर! लोकमान्यांचे उदाहरण समोर ठेव !
“पण अप्पा दुःखाने विव्हाल होते .ते म्हणाले, “आम्ही लोकमान्य नाही आम्ही लेचिपेची माणसं !” त्यावर आजोबांनी हातात चिपळ्या घेतल्या .आणी म्हणाले ,”होय !पण उदाहरण लोकमान्यांचे डोळ्यासमोर ठेवले पाहिजे .”
आणि त्यांनी स्वतः असलेले भजन रोजच्याप्रमाणे अर्धांग वातामुळे कापऱ्या थरथरत्या आवाजात म्हणणे सुरू केले.
काय होता त्यांच्यासमोर आदर्श ? पुण्यात १८९७ साली प्लेगने धुमाकूळ घातला .दुष्काळ व त्यापाठोपाठ प्लेग ! लोक तात्पुरत्या झोपड्यातुन राहत होते. असेच टिळक झोपडीत बसून केसरीचा अग्रलेख लिहीत होते ,एवढ्यात विश्वनाथ त्यांचा मुलगा गेल्याची बातमी आली .ते क्षणभर विचलित होऊन लगेच पुढचा अग्रलेख लिहू लागले, आणि त्यांनी तो पूर्ण केला. कुणीतरी त्यांना हटकले तेव्हा ते म्हणाले ,”प्रत्येकाच्या घरातील गोवऱ्या ओंकारेश्वरावर गेल्या आहेत. त्यातच आमच्याही घरच्या गेल्या.” हेच ते लोकमान्यांचे उदाहरण. कर्तव्य करीत राहिलेच पाहिजे. कर्तव्याचा उद्योग सुरू करायचा हाच दुःखावर चा उपाय आहे असे ते म्हणत. ते तत्त्वज्ञानी च होते
पण संत गाडगेबाबा तर अशिक्षित .मात्र त्यांचा मुलगा गोविंदा अपघातात मरण पावल्याची बातमी आली तेव्हा ते नाम संकीर्तन करत होते. मिनिट फार सुन्न झालेले गाडगेबाबा म्हणाले, “अरे ऐसे गेले कोट्यानुकोटी l रडू काय तेथे एकाच साठी !” आणि परत संकीर्तनात रमून गेले.
मन शरीर विकलांग होतं. पण न कुरकुरता संपूर्ण आयुष्य कर्मयोग जगत राहायचं हे शिकावं तर त्यांच्याकडूनच ! स्वतः लेखकाच्या आजोबांच्या मृत्युच्या प्रसंगी, अंतसमय जवळ आलेला. डॉक्टर जवळ येऊन बसले नाडी बघितली आणि विचारले काय होतंय ? आजोबांनी काय उत्तर द्यावं ?
“मी नेहमी ने जाण्यापूर्वी लक्ष केंद्रित करून अनाहत ध्वनी ऐकण्याचा प्रयत्न करतो. तथापि आज माझे केंद्रित केलेले लक्ष अचानक सुटले ! त्याचा मला त्रास होत आहे. “आश्चर्यचकित करणारा हे उत्तर आहे.
त्यांना नीट श्वास घेता येत नव्हता. आपला अर्धांगवात मधुमेह अंगावरचे फोड या सगळ्यांच्या तक्रारी सोडून दिलेलं हे उत्तर ! आणि दुखण्याचा त्रास काय होतोय ? यावर त्यांनी उत्तर दिलं ,”सोसण्यापुरता आहे !”
लेखक स्वतः नवा काळ असे संपादक आजतागायत खालिस्तानी धमक्या आणि गॅंगस्टर यांच्या धमक्या येऊनही पहाटे चार पर्यंत ते एकटेच अग्रलेख लिहीत बसू शकले ते त्यामुळेच ्रत्येक प्रसंगाच्या तटस्थ विश्लेषण करण्याची देणगी त्यांना आजोबांकडून मिळाली. लेखक म्हणतात माणसाला थांबावे कुठे हे कळले नाही तर त्याचा शोकांतिकेत अखेर होतो जर समजले तर अखेरच्या क्षणापर्यंत कर्तुत्ववान म्हणून जगता येते. त्यासाठी त्यांनी स्टॅलिन ने हिटलर बद्दल केलेले विधान सांगितले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने सोविएत युनियनचा मैत्री करार केलेला असतानाही दगाबाजी करून विध्वंस केला. त्यावेळी स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली हिटलरचा पराभव केला गेला .यावर स्टॅलिन म्हणतो ,”असामान्य नेता होता हिटलर ! महायुद्धातून बेचिराख झालेला जर्मनी आणि त्याने परत असा केला की जगाला भारी ठरेल. तो महान संघटक होता. पण त्याचा मोठा दोष हा की त्याला कळलं नाही थांबावं कुठे ! “यात स्टॅलिनच्या मनाचा तटस्थपणा हा देखील अनुभवास येतो. लेखक म्हणतात त्यांच्या आजोबांना म्हणजेच महाराष्ट्राच्या या महान नाटक करायला केवळ नाटकातच नव्हे तर जीवनात ही थांबावे कुठे हे अचूक समजले.
फ्रेंड्स ! आज दूरदर्शन ,मोबाईल ,स्पर्धेचा ताण व जीवनाला आलेली जीवघेणी गती ! मनन चिंतन याला वेळ नाही आणि मूडही नाही. यावेळी ज्या दिपस्तंभानी लेखकाला मार्गदर्शन केले, त्याबद्दलची ही केवळ एक झलक ! हे संपूर्ण पुस्तक वाचावे असेच आहे. आजही विविध आदर्श व्यक्तिमत्व किंवा पुस्तके आपल्यासाठी दीपस्तंभाचे काम करत आहेत. त्याच्या वाचन चिंतनातून देखील हे दीपस्तंभ बनुन कायम आपल्याला वाट दाखवत राहतात.
मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला