निलेश राणेंकडून रत्नागिरी कारागृहातील कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट

रत्नागिरी(प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता माजी खासदार, भाजपा नेते तथा लाईफटाईम हॉस्पिटलचे संचालक निलेश राणे यांनी रुग्णांना हाताळणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना काही दिवसांपर्वी पीपीई किट उपलब्ध करून दिले होते.

जिल्हा शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता पीपीई किट उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर रत्नागिरी विशेष कारागृहातील कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पीपीई किट उपलब्ध करून दिली आहेत. तुरुंग अधिकारी अमेय पोतदार यांच्याकडे हे पीपीई किट सुपूर्द केली आहेत. यावेळी नित्यानंद दळवी, ययाती शिवलकर, अभिलाष कारेकर उपस्थित होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER