‘पावरकट’ची होणार चौकशी – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray.jpg

मुंबई :- मुंबई आणि उपनगर तसेच नवी मुंबईत आज वीजपुरवठा खंडित झाला होता. युद्धपातळीवर कंकरून तीन साडेतीन तासात बहुतांश वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वीजपुरवठा खंडित झालेल्या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे तसेच यापुढे याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले.

या बैठकीत उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी माहिती दिली. रुग्णालये आणि रेल्वेचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरळीत करण्यात आला अशी माहिती उर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिली.

मुंबई महानगर क्षेत्रातील वीजखंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा येथे बैठक घेतली. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे तसेच बेस्ट, टाटा, अदानी या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हा बिघाड अनपेक्षित होता की अपेक्षित होता, यात काही गाफिलपणा झाला आहे का हे तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले व ज्या कारणांमुळे ही घटना घडली त्या वाहिन्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यास सांगितले. पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असून यादृष्टीनेही विजेच्या मागणीचा विचार करुन सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुंबईमध्ये आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. बेस्टने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली. टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटले. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीजवितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरे जागे व्हा – चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER