सत्ता येणार… ही भाजपची भविष्यवाणी कधीच सत्य होत नाही; नवाब मलिकांचा टोला

Nawab Malik

मुंबई : राज्यात सत्ता येणार ही भाजपची (BJP) भविष्यवाणी खरी ठरत नाही. यामुळे पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी आपला पक्ष बदलू नये; कारण भाजप नेते निराश झाले असून ते तारीख पे तारीख देत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक ( Nawab Malik) यांनी केली आहे. यावेळी नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर टीकास्त्र सोडले. कोरोना, तौक्ते चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यासारख्या अडचणी असूनही आघाडी सरकारने सर्व परिस्थितीवर मात करून जनतेला मदत करण्याची भूमिका घेतली. जनता संतुष्ट आहे.

मात्र, सत्ता येणार… सत्ता येणार… असे बोलून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजप करत आहेत. त्यांचा हाच एककलमी कार्यक्रम आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच इतर पक्षातून आलेले आमदार स्वगृही परत जाऊ नये, या भीतीने राज्यात लवकरच सत्ता येणार, असे भाजपकडून वारंवार सांगितले जाते. परंतु आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहेत. त्यामुळे आघाडीला कसलाही धोका नाही, असे मलिकांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button