मुंबईतील विजपुरवठा सुरळीत, लोकल सुरू

Mumbai Power Cut - Local Train

मुंबई :- वीज ठप्प झाल्यामुळे (Power Cut) मुंबईसह (Mumbai) उपनगरामध्ये वीज पुरवठा खंडीत झाला होता. अखेर युद्धपातळीवर काम करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

महापरेषणच्या 400KV कळवा पडघा GSI केंद्रात सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या काही तासांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे रेल्वेसेवा, कार्यालये आणि इतर दैनंदिन कामांवर याचा परिणाम झाला.

अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वीज पुरवठा हा सुरळीत झाला आहे.

‘महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होते. त्यावेळीसर्व भार हा सर्किट दोनवर टाकण्यात आला होता. मात्र, सर्किट दोनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे’ अशी माहिती राऊत यांनी दिली. तसंच, वीज पुरवठा अर्ध्या तासात सुरू होऊन जाईल, असं आश्वासनही नितीन राऊत यांनी दिले होते. अखेर मुंबईतील वीज पुरवठा हा पूर्ववत झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER