पाॕवर प्लेमध्ये गोलंदाजांचे अपयश हे भारताचे जुनेच दुखणे

Power play is a headache to Indian Bowlers

आॕस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यात भारतीय (India) गोलंदाज झोडपले जात आहेत. जसप्रीत बुमरा (Jaspreet Bumrah) व मोहम्मद शामीसारखे (Mohammed Shami) जगभरात कौतुक मिळवलेले गोलंदाजही त्याला अपवाद ठरलेले नाहीत. गेल्या सलग पाच सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाज पॉवर प्लेमध्ये (Power Play) एकसुध्दा विकेट काढू शकलेले नाहीत आणि धावासुध्दा रोखू शकलेले नाही. या सामन्यांमध्ये पॉवर प्लेमध्ये किमान 51 पेक्षा अधिकच धावा निघाल्या आहेत. साहजिकच हे पाचही सामने आपण गमावले आहेत. यंदाच्या आठ वन डे सामन्यांमध्ये आपल्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये फक्त तीन विकेट घेता आल्या आहेत.

त्यामुळे विराट कोहलीचा वेगळ्या गोलंदाजाचा शोध सुरु झाला आहे आणि हार्दिक पांड्याला गोलंदाजी करावी लागेल अशी चिन्हे आहेत. अलीकडेच आयपीएलमध्ये प्रभावी ठरलेल्या भारतीय गोलंदाजांचे हे अपयश आश्चर्यजनक आहे. हाच संघ गेल्या वर्षी अॉस्ट्रेलियात मालिका जिंकला होता आणि इंग्लंडमधल्या विश्वचषक स्पर्धेतही आपण सेमीफायनल पर्यंत पोहोचलो होतो. पण याच काळात म्हणजे 2019 पासून पहिल्या 10 षटकात भारतीय गोलंदाजांचा इकानॉमी रेट 51.52 आहे. यापेक्षा खराब इकॉनाॕमी रेट फक्त स्कॉटलंड व बांगलादेशचा आहे. या गेल्या दोन वर्षाच्या काळात भारतीय संघाने सर्वाधिक वन डे सामने खेळले आहेत आणि त्यातील 36 डावांपैकी 15 डावांच्या पॉवरप्लेमध्ये आपल्या गोलंदाजांना अजिबात यश मिळालेले नाही. या 36 पैकी 17 सामन्यात भूवनेश्वर कुमार खेळलेला नाही आणि त्या 17 सामन्यात पॉवर प्लेमधील आपल्या विकेट आहेत फक्त आठ! याचाच अर्थ भूवनेश्वर कुमार नसताना पहिल्या टप्प्यात आपले गोलंदाजीत वांधे झालेले आहेत. पण भूवनेश्वरही सध्याच्या आॕस्ट्रेलिया दौऱ्यात फरक करु शकला असता का, हे खात्रीने सांगता येणार नाही कारण पॉवर प्लेमध्ये अजुनही शामीची सरासरी भुवनेश्वरपेक्षा चांगली आहे आणि जसाप्रीत बुमराचे नियंत्रण या तिघांत सर्वात चांगले आहे. असे असले तरी बुमरा व शामी झोडपले गेले आहेत त्यामुळे भुवनेश्वर कुमारबद्दलही खात्री देता येत नाही. आॕस्ट्रेलियात चेंडू फारसा स्विंग होत नाही हेसुध्दा याचे एक कारण आहे.

सुरुवातीला भारतीय गोलंदाजांचे अपयश हे जुनेच दुखणे आहे कारण 2019 च्या विश्वचषकाआधीसुध्दा भारताने जे 27 पैकी 20 सामने जिंकले होते त्यातसुध्दा सलामी गोलंदाज नाहीत तर मधल्या फळीच्या गोलंदाजांनीच यश मिळवले होते. युझवेंद्र चाहल, कुलदीप यादव व भुवनेश्वर कुमार यांचे त्यात योगदान होते. पण भुवनेश्वर कुमारला वारंवार होणाऱ्या दुखापतीमुळे त्याच्याकडून फारशा अपेक्षा बाळगता येणार नाहीत.

अशा स्थितीत सलामी गोलंदाज म्हणून दीपक चाहर व नवदीप सैनी यांचा विचार होऊ शकतो. सैनीला सलामीला वापरले तर बुमराला जुन्या चेंडूसह गोलंदाजी करता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER