मुंबईतील विजपुरवठा खंडीत: कंगनाला काही करमेना ; पुन्हा राज्यसरकारला डिवचले

Kangana Ranaut - CM Uddhav Thackeray

मुंबई : मुंबई (Mumbai) आणि ठाणे (Thane) उपनगरात आज सकाळी अचानक वीज पुरवठा (Power Cut) ठप्प झाला होता. अखेर अडीच तासांच्या प्रयत्नानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र, वीज पुरवठा खंडित झाल्याने मुंबई-ठाणेकर त्रस्त झालेले असतानाच नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून मीम्सच्या माध्यामातून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. नेटवर मीम्सचा पाऊस पडत असतानाच अभिनेत्री कंगना रणौतनेही (Kangana Ranaut) या संधीचा फायदा घेत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

वीज पुरवठा खंडित झाल्याने कंगनाने एक ट्विट केलं असून या ट्विटमध्ये शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा फोटोही पोस्ट केला आहे.

या फोटोला कंगनाने एक कॅप्शनही दिले आहे. तिने लिहले आहे की, ‘एकीकडे मुंबईत वीज पुरवठा खंडीत झाला आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार अजूनही क क क…कंगना करत आहे’ असा टोला कंगनाने संजय राऊत यांची खिल्ली उडवत राज्य सरकारला टोला लगावला आहे.

कुणाल कामरा (Kunal Kamra) हा ‘शट अप कुणाल’ हा पॉडकास्ट कार्यक्रम सुरू करत आहे. या पॉडकास्टची सुरुवात कुणालने संजय राऊत यांची मुलाखत घेऊन केली आहे. दरम्यान, कंगना नेहमीच शिवसेनेवर ट्विटर युद्ध करीत असते. आज सकाळी मुंबईतील वीज पुरवठा खंडीत झाल्याची संधी पाहून आता कंगना आणि शिवसेनेत पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER