खराब भाजीपाल्यापासून वीजनिर्मिती, पंतप्रधानांनी केले कौतुक

सिकंदराबाद : हैदराबादमधील बोवनपल्ली भाजी बाजारात खराब झालेल्या भाज्यांपासून रोज ५०० युनिट विजेचे उत्पादन करण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये याचा उल्लेख केल्यापासून हा प्रकल्प चर्चेत आला आहे. बोवनपल्ली हा हैदराबादच्या सीमेवरील सिकंदराबादमधला ५५ वर्षे जुना भाजीबाजार आहे. या भाजी बाजारात रोज सुमारे १० टन कचरा गोळा होतो. आधी हा कचरा फेकून देत होते. आता या सेंद्रिय कचर्‍यातून रोज सुमारे ५०० युनिट विजेचे व ३० किलो बायोगॅसचे उत्पादन होते. या विजेने १०० स्ट्रीट लाइट्स, मंडीतले १७० स्टॉल, १ प्रशासकीय इमारत आणि पाणीपुरवठ्यासाठी वापरली जात. बायोगॅस ह्या बाजाराच्या कॅन्टीनमध्ये स्वयंपाकसाठी दिला जातो.

आयआयसीटीचा प्रकल्प

हैदराबाद येथील सीएसआयआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (IICT) च्या वैज्ञानिकांनी त्यावर काम सुरू केले. आता त्याचे पेटंटही घेण्यात आले आहे. सध्या IICT च्या देखरेखीखाली एक इंजिनीअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे काम करते आहे.

या प्रकल्पात महत्वाची भूमिका बजावणारे वैज्ञानिक डॉ. ए. जी. राव यांनी माहिती दिली की, या प्रकल्पात आतापर्यंत सुमारे १४०० टन भाजीपाल्यातून सुमारे ३२ हजार युनिट वीज व सुमारे ७०० किलो खत निर्मिती झाली आहे. खत शेतीसाठी वापरले जाते आहे.

मोदींनी केले कौतुक

पंतप्रधान मोदी त्यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात या प्रयोगाचा उल्लेख केला होता. या प्रयोगामुळे बाजार समितीचे वीज बिल दरमहा सुमारे दीड लाख रुपये कमी झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER