साताऱ्यात होणार बटाटा संशोधन केंद्र

Potato Research Center

सातारा :सातारा जिल्ह्यात कोरेगाव, खटाव, महाबळेश्वर, फलटण आदी तालुक्यात बटाटा पिकाचे उत्पादन (Potato Research Center) मोठ्या प्रमाणात होत असल्याने याबाबत जिल्हा परिषद कृषी समितीने ठराव करुन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडे पाठवला होता. हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून या प्रस्तावानुसार वाकेश्वर (ता. खटाव) येथे बटाटा संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांची जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी भेट घेऊन हा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली आहे.

सातारा जिल्ह्यात कोरेगाव, खटाव, महाबळेश्वर, फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात आणि अन्य तालुक्यात अल्प प्रमाणात बटाटा लागवड करण्यात येते. अनेकदा बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होत नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होते. बटाटा बियाण्याबाबत अनेकदा तक्रारी होतात. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. अनेक बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी मंगेश धुमाळ यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित केला होता. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मंगेश धुमाळ यांनी याबाबत माहिती घेतली असता यापूर्वी खटाव तालुक्यात बटाटा संशोधन केंद्र सुरु करण्याबाबत हालचाली झाल्या होत्या. मात्र यामध्ये यश आले नव्हते. आता हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER