मराठा आरक्षणावरील स्थगिती : ९ डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी

Ashok Chavan

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला (Maratha reservation)दिलेली स्थगिती उठविण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या अर्जावर ९ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. ही सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठासमोर दुपारी दोन वाजता होईल. अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक (Ashok Chavan) चव्हाण यांनी दिली. (hearing on removal of the stay on Maratha reservation will be on 9th December)

एसईबीसी प्रवर्गांतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्याची मागणी राज्य शासनाने केली आहे. त्यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने घटनापीठ स्थापन करुन आरक्षणविषयक सुनावणी घटनापीठासमोर करावी, अशी मागणी अर्जाद्वारे केली होती. ती मागणी मान्य झाली आहे. आता पाच सदस्यीय घटनापीठासमोर ९ डिसेंबरला मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. अशी माहिती अशोक चव्हाण यांनी ट्विटर अकाऊंटवरुन दिली.

दरम्यान, मराठा आरक्षणाला मिळालेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी घटनापीठ स्थापन करुन राज्य सरकारच्या अर्जावर सुनावणी केली जावी, अशी मागणी राज्य सरकारने केली होती. राज्य सरकारची ही मागणी मान्य होण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच चव्हाण यांनी केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER