मराठा आरक्षणाला स्थगिती : निराश झालेल्या युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Maratha Reservation - Youth Suicide Attempt - Latur

लातूर : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती मिळाल्याने निराश झालेल्या चाकूर तालुक्यातील बोरगाव येथील एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आज गुरुवारी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास चाकूर येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ही घटना घडली. किशोर कदम (वय २५) असे विष प्राशन केलेल्या युवकाचे नाव आहे.

प्रारंभी त्यास चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला लातूरला हलविण्यात आल्याची माहिती तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी दिली. सदर युवक उच्चशिक्षित असून तो राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता.

आरक्षणासाठी केलेली लढाई व नोकरी मिळवण्यासाठी केलेली मेहनत मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे वाया गेली आहे. व्यथित होऊन मी हे कठोर पाऊल उचलत असल्याचे त्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER