‘घर घर राशन’ योजनेला स्थगिती; केजरीवालांना संबित पात्रांचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली : दिल्ली सरकार विरुद्ध केंद्र सरकार या वादाला पुन्हा एकदा फोडणी मिळताना दिसत आहे. केंद्राने दिल्ली सरकारच्या ‘घर घर राशन’ योजनेला लाल कंदील दाखवला आहे. प्रत्येक घरापर्यंत रेशन देण्याची योजना आखली होती. यावरून आता भाजपा (BJP) व केजरीवाल सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी केजरीवालांच्या आरोपांचे खंडन करत, दिल्ली सरकारवर निशाणा साधला आहे.

या योजनेला केंद्राकडून स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली. यावर आता भाजपानेही प्रत्युत्तर दिले आहे. संबित पात्रा म्हणाले की, “केजरीवाल यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी दिल्लीच्या गरीब जनतेला त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवत आहेत आणि ‘घर घर राशन’ला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.

पंतप्रधान मोदी नॅशनल फूड सिक्युरिटी अ‍ॅक्ट आणि पीएम गरीब कल्याण योजनेद्वारे गरजूंना रेशन पोहचवत आहेत.” तसेच, “मोदी सरकारने दिल्लीला आतापर्यंत नॅशनल फूड सिक्युरिटी अ‍ॅक्ट अंतर्गत ३७ हजार ४०० मेट्रिक टन धान्य पाठवले आणि पीएम गरीब कल्याण योजने अंतर्गत ५ जूनपर्यंत ७२ हजार ७८२ मेट्रिक टन धान्य पाठवले आहे. दिल्लीकडे ५३ हजार मेट्रिक टन धान्य आहे. यातील केवळ ६८ टक्केच जनतेला वाटप झाले आहे.” अशीदेखील माहिती संबित पात्रा यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button