पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला स्थागिती; ठाकरे सरकारचा निर्णय

Uddhav Thackeray - Ajit Pawar - Maharashtra Today

मुंबई : पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास ठाकरे सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. या निर्णयावरून राज्य सरकारवर चहूबाजूंनी टीका-टिप्पणी होत आहे. आरक्षण रद्द झाल्याने नाराज झालेल्या मराठा समाजास या निर्णयाच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केल्याचे सांगितले जात आहे.

राज्य शासनाने शुक्रवारी पदोन्नती कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी ३३ टक्के आरक्षणाचे निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला. यावरून पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे आता २५ मे २००४ च्या सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय स्थगित करण्यात आला. पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेईल, त्यानुसार मागासवर्गीय प्रवर्गातील आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे राज्य सरकारने जीआरमध्ये म्हटले होते. सरकारी सेवेत नोकरीला लागताना आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना पदोन्नतीत लाभ घेता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०१७ मध्ये दिला होता. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मागासवर्गीय समाजात असंतोष निर्माण झाला आहे. राज्य सरकारने विशेष अनुमती याचिकेद्वारे या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने यावर कोणताही निर्णय दिला नाही.

मात्र, पदोन्नती आरक्षण रद्द केल्याने ठाकरे सरकारवर चहूबाजूंनी टीका होत होती. याशिवाय काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही पदोन्नीतील आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली होती. गेल्या साडेतीन वर्षांपासून कोणताच निर्णय घेतला नाही. यामुळे खुल्या प्रवर्गातील अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागले. काही अधिकाऱ्यांना तर पदोन्नतीला पात्र असूनही सरकारने निर्णय न घेतल्यामुळे या लाभापासून वंचित राहावे लागले. मध्यंतरी मराठा समाज तसेच खुल्या प्रवर्गातील अधिकाऱ्यांनी याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला. त्यानंतर सेवाज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती कोट्यातील सर्व रिक्त जागा भरण्याचा निर्णय सरकारने फेब्रुवारी महिन्यात घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button