कमलनाथ यांचा ‘स्टार कॅम्पेनर’दर्जा रद्द करण्यास स्थगिती

सुप्रीम कोर्ट आयोगाचे अधिकार तपासणार

Kamalnath

नवी दिल्ली :- मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकांच्या प्रचारात काँग्रेस (Congress) नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांचा ‘मुख्य प्रचारक’ (Star Campaigner) हा दर्जा रद्द करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयानेे सोमवारी अंतरिम स्थगिती दिली.

सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. ए.एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामसुब्रह्मण्यन यांच्या खंडपीठाने ही स्थगिती देईपर्यंत या पोटनिवडणुकांचा प्रचार संपला रहोता व तेथे उद्या मतदान व्हायचे आहे. निवडणूक आयोगाचे ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी यांनी हिच बाब निदर्शनास आणली व आता कमलनाथ यांची याचिका निरर्थक झाली असल्याचा मुद्दा मांडला. कमलनाथ यांचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी यास विरोध करून सांगितले की, प्रचार संपला असला तरी याचिका निरर्थक झालेली नाही. कारण त्यातील कायद्याचे मुद्दे अजूनही लागू आहेत.

सरन्यायाधीश व्दिवेदी यांना म्हणाले, आम्ही तुमच्या आदेशाला स्थगिती देत आहोत. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ अन्वये एखाद्या राजकीय पक्षाचा ‘स्टार कॅम्पेनर’ कोण असावे किंवा असू नये हे ठरविण्याचा निर्णय तुम्हाला (आयोगाला) कोणी दिला? याचा निर्णय पक्षाने घ्यायचा की तोही तुम्हीच घेणार?

या निवडणुकांच्या प्रचारात कमलनाथ यांनी निवडणूक आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केल्याचे कारण देत निवडणूक आयोगाने त्यांचा ‘स्टार कॅम्पेनर’ हा दर्जा रद्द करण्याचा आदेश २८ ऑक्टोबर रोजी काढला होता. त्यात कमलनाथ यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना ‘माफिया’, ‘नौटंकी कलाकार’ व ‘मिलावटखोर’ असे म्हटल्याचा संदर्भ दिला होता. तसेच भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांना प्रचारसभेत ‘आयटेम’ म्हटल्याबद्दल २६ ऑक्टोबर रोजी कमलनाथ यांना समज देण्यात आली होती, याचाही उल्लेख आयोगाने केला होता.

ही बातमी पण वाचा : निर्दयी ‘बीएमसी’ला सणसणीत चपराक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER