फोन टॅपिंग चौकशीला स्थगिती द्या; रश्मी शुक्ला यांची उच्च न्यायालयात याचिका

Maharashtra Today

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी (phone tapping case) आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना पोलिसांनी समन्स बजावून चौकशीला बोलावले. दरम्यान, या चौकशीला स्थगिती द्या, अशी याचिका रश्मी शुक्ला यांनी हैद्रराबाद उच्च न्यायालयात (Hyderabad High Court) दाखल केली आहे.

राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने चौकशीसाठी बोलावले होते. पण, कोरोनाचे कारण देऊन शुक्ला यांनी हजर राहण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले होते. चौकशी अधिकारी आपला छळ करत आहे, असा आरोप रश्मी शुक्ला यांनी केला आहे. रश्मी शुक्ला यांनी हैद्राबाद उच्च न्यायालयात २९ एप्रिल रोजी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ६ मे रोजी सुनावणी होणार आहे, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

रश्मी शुक्ला सध्या हैदराबाद येथे आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तुम्ही प्रश्नावली ईमेलद्वारे पाठवावी, त्याला उत्तर देते, असे शुक्ला यांनी समन्सला उत्तर दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा याबद्दल समन्स बजावण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button