गलवान खोऱ्यातील चकमकीत शहीद कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र

Colonel Santosh Babu

नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी दोन हात करताना शहीद झालेले कर्नल संतोष बाबू (Colonel Santosh Babu) यांना मरणोत्तर महावीर चक्र देण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून शौर्यपदक विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. (Colonel Santosh Babu who lost his life in Galwan valley clash has been awarded Mahavir Chakra posthumously)

लडाखमधील पँगाँग सरोवराच्या परिसरात काही महिन्यांपासून भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. १५ जून २०२० च्या रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. चिनी सैनिकांनी लोखंडी रॉड आणि काटेरी तारा लावल्या दांड्यानी भारतीय सैनिकांवर अचानक हल्ला केला. कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्त्वाखालील बिहार रेजिमेंटच्या जवानांनी न डगमगता चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, या झटापटीत कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारताचे २० जवान शहीद झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER