सेना vs मनसे : ठाण्यात मनसेचे अविनाश जाधव पालकमंत्र्यावर भारी !

Poster war Sena vs MNS

ठाणे :- मनसेचे ठाणेशहर प्रमुख अविनाश जाधव हे आता ठाणे जिल्हाचे भारी पडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर मनसे सैनिकांकडून टीका करण्यात येत आहे. अलिकडे शिवसेनेनेही त्यांच्या टीकेला उत्तर दिले. मात्र मनसे मननिकांनीही काही दिवसांपासून सुरू असलेला सोशल मीडियावरचा वॉर आता पोस्टरवर आणला आहे. आज ठाणेकरांना तीन हात नाका येथे पोस्टर वॉर पाहायला मिळाला. एकीकडे पालकमंत्री यांच्या कार्याचे दाखले देणारा तर दुसऱ्या बाजूला अविनाश जाधव कधी थांबणार नाही असे म्हणणारे होर्डिंगस लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांची ही श्रेयवादाची लढाई सुरू असल्याची प्रतिक्रिया ठाणेकरांनी दिली.

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पाच जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस आल्यानंतर आणि त्यांना अटक झाल्यानंतर मनसैनिकांकडून पालकमंत्री यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली. सोशल मीडियावर ही शाब्दिक युद्ध सुरू होते. त्या आधी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची मागणी मनसैनिकांकडून केली जात होती. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे राम रेपाळे यांनीही त्यांच्या टिकेला उत्तरे देऊन पालकमंत्री यांच्यावर वैयक्तिक टीका करणे चुकीचे आहे असे म्हटले होते. दोन्ही पक्षातील वाद अद्याप मिटलेला नाही हे तीन हात नाका येथे लावण्यात आलेल्या होर्डिंगस वरून दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER