कोल्हापुरात धोनी आणि शर्मा समर्थकांत पुन्हा पोस्टर वॉर

MS Dhoni - Rohit Sharma Poster Kolhapur

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात कुरुंदवाड येथे दीड महिन्यांपूर्वी धोनी विरुद्ध शर्मा यांच्यातील पोस्टर वॉरनंतर एका गटाच्या समर्थकाला उसाच्या फडात नेऊन चोप दिल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणाची दखल घेत, क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने, आम्ही सर्व खेळाडू एकच आहोत, चाहत्यांनी संयम बाळगावा, असा सल्ला ट्विटरद्वारे दिला होता. मात्र, आता आयपीएल क्रिकेट सामने सुरू होताच, कोल्हापुरात महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) विरुद्ध रोहित शर्मा (Rohit Sharma) समर्थकांचे पोस्टर वॉर सुरू झाले आहे.

आयपीएल (IPL) सामने सुरू होताच गावागावांत विविध टीम आणि त्यांचे समर्थकांचेही गट निर्माण झाले आहेत. त्यातूनच गट-तट आणि एकमेकांविरोधात ईर्ष्याही शिगेला पोहचत आहे. आयपील सुरू होण्यापूर्वी भडकलेले पोस्टर वॉर पुन्हा धोनी विरुद्ध शर्मा समर्थक असेच आहे. आतापर्यंत सोशल मीडियातून दिसणारी ही ईर्ष्याही आता मोठमोठ्या फलकांद्वारे ग्रामीण भागातील चौकात झळकू लागली आहे. यंदाच्या आयपीए हंगामातील सलामीच्या सामन्यांत मुंबई इंडियन्स पराभूत झाल्यानंतर राधानगरी तालुक्यातील मार्केट चौकात मुंबई इंडियन्सच्या पोस्टरला लागूनच चेन्नई सुपर किंग्जच्या टीमचे भव्य पोस्टर समर्थकांनी लावले. दोन्हींवर फक्त महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांचेच फोटो आहेत. मुंबई इंडियन्सच्या पोस्टरवर ‘जल मत बराबरी कर’, ‘नावातच दहशत’ आणि ‘अण्णा म्हणत्यात सलाम ठोकत्यात’ असा मजकूर आहे. तर चेन्नई सुपर किंग्जच्या पोस्टरवर ‘धोनी साहेब’ व ‘अण्णा गेले बंबात’ असा एकमेकांना चिथावणी देणारा मजकूर आहे. गेल्या एक-दोन दिवसांपासून हे पोस्टर चर्चेचा विषय बनला आहे. पोस्टर वॉरला स्थानिक राजकारणाचीही किनार असल्याने पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढवणारी आहे. अद्याप पोलिसांकडून कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER