मुलीच्या नावाची घोषणा करून अनुष्का शर्माने शेअर केले पोस्ट

Virat Kohli & Anushka Sharma

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) सोमवारी त्यांच्या मुलीचे नाव जाहीर केले. त्यांनी तिचे नाव वामिका ठेवले. अनुष्का शर्मा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह राहते. नाव जाहीर केल्यानंतर अनुष्काने एक पोस्ट शेअर केली जी सहानुभूती आणि करुणाशी संबंधित आहे.

अनुष्का शर्माने एक सकारात्मक पोस्ट शेअर केली. त्यात पांढरा रंगाचा घोडा बसलेला दिसतो आणि त्याच्या समोर एक बाळ बसलेला दिसतो. अनुष्का शर्माने लिहिले की, “क्या आप उन दूसरे लोगों से मिले हैं, जिन्होंने काफी स्ट्रगल किया है? मैं आज तक किसी ऐसे से नहीं मिली हूं, जिसने मेहनत न की हो।”

असे म्हटले जात आहे की विराट कोहलीच्या नावाचे प्रारंभिक अक्षर ‘V’ आणि अनुष्का शर्माच्या नावाचे शेवटचे अक्षर ‘Ka’देखील यात समाविष्ट आहे. मात्र, याबद्दल फक्त कयास लावले जात आहेत, विराट आणि अनुष्काकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अनुष्का आणि विराटने शेअर केलेल्या फोटोत मुलीचा चेहरा दिसत नाही. विशेष म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे चाहते बरेच आहेत. विराट कोहली क्रिकेट मैदानात आपला दमखम दाखवतो, तर दुसरीकडे अनुष्का शर्मा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपली जादू पसरवते.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER