पोस्ट ऑफिसचे १ एप्रिलपासून बदलणार नियम!

Post Office

पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकांनी आता AEPS वर (आधार आधारित पेमेंट सिस्टम) शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम १ एप्रिल २०२१ पासून लागू करण्यात येणार आहे. मूलभूत बचत खाते असल्यास महिन्यातून चार वेळा पैसे काढणे विनामूल्य (Free) आहे. त्यानंतर इतर व्यवहारावर शुल्क म्हणून किमान २५ रुपये किंवा मूल्याच्या ०.५० टक्के कपात केली जाईल.

मूलभूत बचत खाते (Basic Saving Accounts) जमा करण्यासाठी कोणतेही पैसे घेतले जाणार नाही. जर पोस्ट ऑफिसमध्ये बचत (मूलभूत बचत खाते वगळता) किंवा चालू खाते असेल, तर एका महिन्यात २५ हजारांपर्यंत पैसे काढणे विनामूल्य (Free) आहे. पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्यांवर मर्यादा लादण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक महिन्यात १० हजारांपर्यंत पैसे जमा करता येतात. इतर व्यवहार करताना त्यावर ०.५० टक्के मूल्य किंवा २५ रुपये द्यावे लागतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER