बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर हिंसाचार; महाराष्ट्रात निदर्शने; चंद्रकांत पाटलांची घोषणा

Chandrakant Patil

मुंबई :- पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी हॅटट्रिक साधली. ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली आहे. मात्र, बंगालच्या निवडणूक निकालानंतर हिंसाचार (Bengal violence) भडकला. यात भाजप (BJP) कार्यकर्त्यांची हत्यासुद्धा झाली. या हिंसाचारात ११ जणांनी जीव गमावला. या हिंसाचाराविरोधात भाजपकडून बुधवारी(उद्या) निदर्शने करण्यात येणार आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. तसेच भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनीही याबाबत माहिती दिली आहे.

ही बातमी पण वाचा : बंगाल हिंसाचार : अशा घटना फाळणीच्या वेळी घडल्याचे ऐकले होते – नड्डा 

बंगालमध्ये सुडाचे राजकारण चालू
चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर टीएमसीचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाला आगी लावणे, असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. राज्यात याच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते शांततामय निदर्शने करतील. कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन केले जाईल. लोकशाहीबद्दल आस्था असलेल्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे.” असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button