
मुंबई : यंदाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर ऐवजी मुंबईतच होणार आहे. याबाबत निर्णय झाला असून,७ डिसेंबरपासून यंदाच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज मुंबईत सुरु होणार आहे. मात्र दिवाळीनंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे मुंबईत होणारे डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच राज सरकारकडूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या ८ ते १० दिवसात कोरोनाची परिस्थिती बघून काही कडक निर्बंध लावले जाऊ शकतात, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कालच दिले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून हिवाळी अधिवेशन पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला