मार्चपासून ५० वर्षांहून अधिक वयोगटांना लस देण्याची शक्यता

नवी दिल्ली : मार्चपासून ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटांना कोरोना लस (corona vaccination) देण्यात येणार आहे. हे लसीकरण मार्चच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात सुरू होऊ शकते. यात ज्येष्ठ नागरिक तसेच सामान्य नागरिकांचा समावेश आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लोकसभेत सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वात कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. देशात जवळपास ५० लाख लोकांना लस देण्यात आली आहे. सध्या सात लसींवर काम सुरू आहे.

यातील तीन लसी क्लिनिकल चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. तर दोन लसी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहेत आणि शेवटच्या दोन लसी प्री-क्लिनिकल टप्प्यात आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोना योद्ध्यांना लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. हे २ फेब्रुवारीपासून ‘फ्रंटलाईन वर्कर्स’साठी लसीकरणाचे काम सुरू झाले आहे, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER