८ किंवा १४ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची शक्यता; मुख्यमंत्र्यांचे संकेत

CM Uddhav Thackeray

मुंबई : वाढत्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) टास्क फोर्सची आज बैठक बोलावली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यात ८ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची (Lockdown) गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठक झाली. यात कोरोनाबाबतचा आढावा घेण्यात आला. लसीकरण आणि लॉकडाऊनवर चर्चा झाली. डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’मध्ये मुंबईसह राज्यातील नामवंत डॉक्टरांचाही समावेश आहे.

१४ दिवसांचा लॉकडाऊन झाल्यास परिस्थिती नियंत्रणात
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेतली. यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कारवाई करणे आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा, असे मत टास्क फोर्सच्या बैठकीत मांडले. पण टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी निदान १४ दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असे मत मांडले आहे. त्यामुळे टास्क फोर्सचे तज्ज्ञदेखील लॉकडाऊनच्या बाजूने आहेत. याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button