महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता; मुख्यमंत्री उद्या संवाद साधणार; एकनाथ शिंदेंची माहिती

Eknath Shinde - CM Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यभरात कोरोनाच्या (Corona Virus) नव्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या दुपटीने वाढत आहे. अशातच राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे (Lockdown) संकेत मिळाले आहेत. उद्यापासून १५ दिवस कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात लॉकडाऊनबाबतची अधिकृत घोषणा उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) करतील, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.

कठोर निर्बंध आवश्यक
“राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवा, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत. ऑक्सिजन प्लांट उभारून हवेतील ऑक्सिजन वापरात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्या निर्णय जाहीर करतील. ऑक्सिजनच्या गाडीला ग्रीन कॉरिडॉरची आवश्यकता आहे. तोसुद्धा घेण्यात आला आहे. यामुळे ऑक्सिजनच्या गाड्यांना राज्यांत येण्यापासून अडथळा निर्माण होणार नाही. लॉकडाऊन हा आवडीचा विषय नाही. कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही.” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ७ ते ११ या वेळेतच सुरू राहणार; राज्य सरकारचा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button